घोडेगाव येथे इफ्तार पार्टीच्या माध्यमातुन हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
३० एप्रिल २०२२

घोडेगाव


रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून घोडेगाव पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. पुणे ग्रामिणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे ,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सदरचा उपक्रम राबविला होता.यावेळी बहुसंख्येने हिंदु -मुस्लीम बांधव उपस्थित होते.

घोडेगाव येथील सुन्नी मोमीन मस्जित येथे इफ्तार पार्टी संपन्न झाली. यावेळी मुस्लिम बांधवांनी खजूर ,फळे व शीतपेयांचा आस्वाद घेतला. तसेच ही रमजान ईद सर्वांनी एकत्र येत आनंदात व शांततेत साजरी करावी असे यावेळी घोडेगावचे पोलीस उपनिरीक्षक सतीष डौले म्हणाले.तसेच अनेक मान्यवरांनी मुस्लीम बांधवांना मार्गदर्शन केले.मौलाना नदीम अजहरी यांच्या उपस्थितीत आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर लहान बालकांचा रोजा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोडण्यात आला.


या प्रसंगी घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक सतीष डौले , घोडेगावचे सरपंच क्रांती गाढवे, उपसरपंच सोमनाथ काळे, पत्रकार निलेश कान्नव , ग्रामपंचायत सदस्य मस्जीत मुजावर ,अकबर पठाण युवा फाऊँडेशनचे अध्यक्ष इम्रान पठाण,पोलीस नाईक अविनाश कालेकर ,दत्तात्रय जढर , होमगार्ड स्वप्नील कानडे ,आसीफ तांबोळी , आलीम शेख , नाजीम मुजावर, तत्वीर मुंढे, तसेच पोलीस कर्मचारी ,अकबर पठाण युवा फाऊँडेशनचे सर्व कार्यकर्ते , सुन्नी मुस्लीम जमात घोडेगाव व स्थानिक नागरिक हिंदु – मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *