चास येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२३ एप्रिल २०२२

चास


चास (ता. आंबेगाव) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात पार पाडला. अशी माहिती मुख्याध्यापक भास्कर चासकर यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून अंगणवाड्या बंद असल्याने बालकांना शाळा पूर्वतयारी कृतीची संधी मिळाली नाही. त्यामुळे बालकांची अपेक्षित शाळा पूर्वतयारी व्हावी व त्याआधारे दाखलपात्र बालकांचे पहिलीच्या वर्गात सहज संक्रमण व्हावे याकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगनवाड़ी चास यांच्यावतीने शाळा पूर्व तयारी मेळावा क्र.१ आयोजित करण्यात आला असल्याचे उपशिक्षक सुनिल भेके यांनी सांगितले.

इयत्ता पहिलीत येणाऱ्या बालकांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत व फेटा बांधून, फुगे, चॉकलेट, गुलाबाची फुले देऊन सत्कार करण्यात आला. बालकांची गावात ”शाळापूर्व तयारी असे आमची शान – विद्यार्थी करू हुशार आणि छान’माझी शाळा मराठी शाळा,सुंदर शाळा,’माझा प्रवेश आजच निश्चित झाला ‘ या संदेशफलकासह प्रभातफेरी काढली. त्यानंतर सरस्वती पूजन शाळा व्यवस्थापन सदस्य के. एस.बारवे यांच्या हस्ते व मेळाव्याचे उद्घाटन जेष्ठ नागरिक शंकर बारवे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी गणेश भागवत, सलीम इनामदार, राजू ईनामदार, विक्रम शेगर,अंगणवाडी सेविका उज्वला चासकर, मदतनीस शोभा खोल्लम,सोनल कढणे, वर्षा भोर ,महिला पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

मेळाव्यात दाखलपात्र विद्यार्थी मुलांची नावनोंदणी करून प्रत्येकाचा शारीरिक विकास ,बौध्दिक विकास, सामाजिक व भावनिक विकास, भाषा विकास,गणनपूर्व तयारी प्रात्याक्षिकांद्वारे क्षमतांची चाचपणी करण्यात आली. पालकांची शाळापूर्व तयारीमध्ये भूमिका काय आहे. यावर पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विकासपत्रक तसेच कृतीपुस्तिका मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर चासकर व आभार सुनिल भेके यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *