पट्टेरी वाघाच्या कातड्याची तस्कर टोळी, शिरूर पोलिसांच्या जाळ्यात…

शिरूर,(विभागीय संपादक,रवींद्र खुडे)
शिरूर शहरातील पाबळ फाटा येथे चारचाकी वाहनातून वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या नऊ जणांच्या टोळीला शिरूर पोलिसांनी जेरबंद केल्याची घटना शुक्रवार दि ६ फेब्रु २०२१ रोजी रात्री १२.१५ वा. घडली.
काही युवक वाघाच्या कातड्याची तस्करी करणार असल्याची माहिती, शिरूर पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस हवालदार संतोष साठे, पोलिस नाईक संजय जाधव, अनिल आगलावे, पोलिस शिपाई प्रवीण पिठले, संतोष साळुंके, करणसिंग जारवाल, विशाल पालवे, सुरेश नागलोत, प्रशांत खुटेमोडे आदींनी शिरूर शहरातील पाबळ फाटा परिसरात सापळा रचला.
त्यावेळी मारुती कंपनीची करड्या रंगाची इको कार, क्रमांक एम एच १४, जे एच ५७२७ व हुंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची एकसेन्ट कार, क्रमांक एम एच १४, जि यु ५२१६ या दोन संशयित मोटारी एकामागे एक आल्याच्या आढळून आल्या. यावेळी पोलिसांच्या पथकाने दोन्ही मोटारींची झडती घेतली असता, त्यापैकी एम एच १४ जि यु ५२१६ या मोटारीच्या डिक्कीमध्ये वाघ सदृश कातडे मिळून आले. यावेळी पोलिसांनी दोन्ही मोटारींमधील युवकांना ताब्यात घेतले.
कारवाई मध्ये (१) मयूर मारुती कोळेकर (वय २२ वर्षे रा. किवळे ता. खेड जि. पुणे), (२) विनायक सोपान केदारी (वय ३० वर्षे रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे), (३) साईराज विजय गाडे वय २० वर्षे (रा. खरपुडी ता. राजगुरुनगर ता. खेड जि. पुणे), (४) चिराग कैलास हांडे (वय २६ वर्षे रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे), (५) कौस्तुभ महादू नायकवडे (वय २८ वर्षे रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे), (६) वैभव अर्जुन गाडे (वय २० वर्षे रा. खरपुडी राजगुरूनगर ता. आंबेगाव जि. पुणे), (७) शिवाजी किसन कुसळकर (वय ३० वर्षे रा. कडा ता. आष्टी जि. बीड), (८) अमोल बाळू राजगुरू (वय ३४ वर्षे रा. वडगाव काशिंबे ता. आंबेगाव जि. पुणे) व (९) धनंजय जयराम पाटोळे (वय २२ वर्षे रा. वडगाव पाटोळे ता. खेड जि. पुणे) यांना ताब्यात घेत, त्यांच्या विरुद्ध वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना अटक करून शिरूर न्यायालयात दि ६ फेब्रु २०२१ रोजी हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १० फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या टोळीत आणखी सदस्य असण्याची शक्यता असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *