ओतूर पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिन संपन्न.

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
२१ एप्रिल २०२२

ओतूर


पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शना खाली ओतूर पोलीस स्टेशनंचे साहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी ओतूर (जुन्नर )पोलीस स्टेशनं येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजण केले होते यामध्ये एकूण ४६ तक्रारिंचे युद्धपातळीवर निरसन केले असल्याची माहिती कांबळे यांनी दिली यावेळी पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके पोलीस हवालदार महेश पटारे, ताऊजी दाते,मुकुंद मोरे,जनार्दन सपाटे, बाळासाहेब तळपे,सागर शिंदे, संदीप सोमवंशी, रोहित बोंबले, देवा किर्वे, सुवर्णा गडगे,देविदास खेडकर, आनंदा भवारी,आशा भवारी, दत्ता तळपाडे, नारायण बर्डे, गजानन डाके, विलास कोंडावळे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेऊन परिश्रम घेतले.

४६ तक्रारिंचे केले निरसन

याबाबत अधिक माहिती घेतली असता दररोज पोलीस स्टेशनला काही लोक विविध तक्रारी घेऊन येत असतात. अत्यंत क्षुल्लक कारणाने देखील एकमेकांवर तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण वाढले होते, पोलीस स्टेशनच्या वतीने मध्यस्थ भूमिका बजावत दोन्ही पार्ट्या सोबत योग्य तो संवाद साधून बहुतांश तक्रारी प्रकरणे निकाली काढण्यात पोलिसांना यश मिळाले असल्याचे समजते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *