मॉडर्न मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१४ एप्रिल २०२२

बेल्हे


मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बेल्हे (ता.जुन्नर) येथील इयत्ता दहावीच्या CBSE बोर्ड च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुलांना परीक्षेच्या काळात आरोग्य व अभ्यासाची उजळणी , परीक्षेत घ्यावयाची काळजी या विषयी शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांनी मार्गदर्शन केले. तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले अनुभव सांगितले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्हींच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. उज्ज्वल यशासाठी आपण काय केल पाहिजे. अध्ययन कसे करावे,प्रश्नांची उत्तरे कशी लिहावी, मनन, चिंतन करावे, नोट्स काढाव्यात.आपली कृती यॊग्य वेळी पुर्ण झाली पाहिजे. यशासाठी नियोजन महत्वाचं असत.निर्णयाची क्षमता बुद्धीत असते. तन,मन आणि बुद्धीचा विकास म्हणजे सर्वांगिण विकास तो झाला की जीवनातील सगळी वादळ झेलन्याची ताकद येते.प्रत्येक क्षण हा अध्ययनप्रण असतो. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून उज्ज्वल यश संपादित करावे आणि शाळेचे नाव उंचवावे असे मत वर्ग शिक्षक मनोहर पटाडे व विज्ञान शिक्षक अमित जाधव यांनी व्यक्त केले. या वेळी प्राचार्या विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे, उपप्राचार्य के.पी.सिंग,डॉ.वैशाली झावरे,ऍक्सेरज कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर किरण झावरे,आपला आवाज न्यूज चँनलचे जुन्नर विभागीय संपादक रामदास सांगळे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. २७ एप्रिल पासून या विद्यार्थीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत असून माळशेज निकेतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ,अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, संचालकांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन नववीच्या विद्यार्थीनी मानसी चंगेडिया व प्रणाली गुंजाळ यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *