किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०६ एप्रिल २०२२
नारायणगाव
हिंदू-मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान हजरत गणपीर बाबा यांच्या संदल उत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संदल उत्सवाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे यावर्षी शुक्रवार दि. ०८ एप्रिल रोजी गणपीरबाबा देवस्थान, वारूळवाडी याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
त्यापूर्वी संदल उत्सव मिरवणुक नारायणगाव येथील मावळेआळी येथून सायं.ठीक ०८:०० वा. गणपीर बाबा चे पुजारी काशिनाथ रखमाजी लोखंडे यांच्या घरातून निघणार आहे. ही भव्य मिरवणूक वाजत गाजत गणपीर बाबा मंदिरापर्यंत काढण्यात येईल. त्यांनंतर बाबांना रात्री १०:०० वा संदल चढविला जाईल. अशी माहिती गणपीर बाबा सेवा मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. गणपीर बाबा देवस्थान हे या परिसरातील एक जागृत देवस्थान मानले जाते. येथे बाहेरगावातून अनेक श्रद्धाळू भाविकभक्त दर्शनासाठी वर्षभर येत असतात. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संदल उत्सवाचा आनंद घेत बाबांच्या दर्शनाचाही लाभ घ्यावा असे आवाहन गणपीर बाबा सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.