मनसे जनता दरबार कार्यालय उद्घाटन

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी,ओझर
८ नोव्हेंबर २०२१

ओझर


महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुन्नर तालुक्याच्या मध्यवर्ती कार्यालयाचे स्थलांतर नुकतेच दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गणेश पूजन करून करण्यात आले.त्याबद्दल सर्वांचे मनसे आभार. सन २०१० साली नारायणगाव एसटी स्टँड शेजारी आळेकर मार्केट येथे स्वर्गीय मनसे आमदार रमेशभाऊ वांजळे यांच्या हस्ते जुन्नर तालुका मनसे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.परंतु सध्या जागेच्या अभावामुळे नवीन जागा, जुन्नर रोड, पार्वती सदन, (जुने पोस्ट ऑफिस) नारायणगाव येथे ऑफिस स्थलांतरित करण्यात आले असून लवकरच काही दिवसात मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे व युवा नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या हस्ते स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जुन्नर तालुक्यातील जनतेच्या काही सामाजिक समस्या व प्रश्न असतील तर मनसे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आव्हाहन पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष मकरंद भाऊ पाटे व सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आपला – मकरंद पाटे (जिल्हा उपाध्यक्ष मनसे पुणे ) मो.नं.८८८८८८८६८५, गणेश शेळके ९८७५४६३१९५ (जिल्हा उपसंघटक मनसे, र.सा.सु.आ. विभाग पुणे)


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *