बहुचर्चित रेल्वे उड्डाणपुलास रक्षा मंत्रालयाचा हिरवा कंदील; निविदा काढण्याचा मार्ग मोकळा

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२२ मार्च २०२२

पिंपरी


पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचे प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पुलाचे काम सुरु करण्यास मिनिष्ट्री ऑफ डिफेन्स विभागाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या कामासाठी निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलासाठी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका ते केंद्र सरकारपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. हा महत्वकांक्षी प्रकल्प होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने वाघेरे यांनी समाधान व्यक्त करत महापालिका अधिका-यांचे आभार मानले.

संदीप वाघेरे यांनी सह शहर अभियंता श्रीकांत सवने, कार्यकारी अभियंता प्रेरणा शिनकर यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले. याबाबत अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले की, पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचे काम मार्गी लावण्यासाठी माझ्याकडून सन मे 2017 सालापासून उड्डान पुलाबाबत पाठपुरावा सुरु होता. यासाठी दिल्ली येथे जाऊन तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. कमांडट,स्टेशन हेडक्वाटर,खडकी यांच्या आदेशानुसार डेअरी फार्म रस्त्यासाठी दोन कोटी 86 लाख 87 हजार 651 रुपये महापालिकेने संरक्षण विभागाकडे जमा केले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने रेल्वे उड्डाणपूलाचे काम हाती घेतले आहे.

संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; वाघेरे यांनी मानले अधिकाऱ्यांचे आभार

दरम्यान,महापालिकेने संरक्षण विभागास दिलेल्या रकमेच्या क्षेत्रफळाइतक्या क्षेत्रावर उड्डाणपूलाचे काम सुरु करण्यास संरक्षण विभागाने त्वरित मंजुरी द्यावी अशी मागणी त्यावेळी मी सीतारामन यांच्याकडे केली होती. तसेच डिफेन्स इस्टेट ऑफिसर पुणे व मिलेट्री डेअरी फार्मचे ऑफिस इन्चार्ज कर्नल ग्यान प्रकाश यांची देखील प्रत्यक्ष भेट घेऊन उड्डानपुलाच्या कामास परवानगी देण्याबाबत विनंती केली होती.

महापालिका व केंद्र शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व बीआरटीएस विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे पिंपरी मिलेट्री डेअरी फार्म येथील बहुचर्चित रेल्वे उड्डाणपूलाचे काम मार्गी लावण्यास यश मिळाले. उड्डाणपुलाचा पिंपरीगाव, पिंपळेसौदागर, रहाटणी, काळेवाडी परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे. या पुलामुळे भुयारी मार्ग, साई चौक, शगुन चौक पुलावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे. पुणे-मुंबई महामार्गाकडे ये-जा करणा-यांची सोय होणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *