जनसेवेचे व्रत पुढे घेऊन जाण्यास कटिबध्द – ऋषिकेश वाघेरे-पाटील

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०९ मार्च २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड शहर आणि महापालिकेच्या जडणघडणीत पिंपरीगाव आणि येथील व्यक्तीमत्वाचा मोलाचा वाटा आहे. कुटुंबियांनी लोकसेवा, जनसेवेचे व्रत स्विकारले. राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि शहराच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिले. हे व्रत पुढे घेऊन जाण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी भूमिका ऋषिकेश संजोग वाघेरे-पाटील यांनी मांडली.

महिला दिनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

ऋषिकेश संजोग वाघेरे-पाटील युवा मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदानावर मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. त्यावेळी आयोजक ऋषिकेश वाघेरे बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, नगरसेविका उषाताई वाघेरे-पाटील, स्वाती (माई) काटे, उषा काळे, सुलक्षणा शिलवंत, निकिता कदम, माजी नगरसेवक दत्तात्रय वाघेरे, रंगनाथ कुदळे, गिरिजा कुदळे, पक्ष प्रवक्ते फजल शेख, रशिद शेख, ह.भ.प. अण्णासाहेब कापसे, सामाजिक कार्यकर्ते म्हस्कू कुदळे, दत्तात्रय शिंदे, सुदाम वाघेरे, कामगार नेते संतोष कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शारदा मुंडे (सामाजिक प्रबोधन), पुनम जाचक, प्रमिला रासकर (सांप्रादायिक), जगताप मॅडम (नर्सिग), लतिका नाणेकर, रुपाली पोखरकर, मनिषा बाणेकर, मनिषा वाघेरे (शिक्षण), डॉ. खैरनार मॅडम (वैद्यकीय), चैत्राली पासलकर (वाणिज्य), लीना माने (पत्रकारिता), कोमल सातुर्डेकर (वकिल), पौर्णिमा अकोलकर (योग अभ्यास), ज्ञानेश्वरी कुदळे (क्रीडा) या कर्तृत्त्ववान महिला भगिनींना सन्मानित करण्यात आले.


या निमित्ताने महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच बाल जत्रेमध्ये लहान मुलांनी विविध खेळण्यांचा आनंद लुटला. नगरसेविका उषाताई वाघेरे-पाटील यांनी महिलांचे स्वागत केले. ऋषिकेश वाघेरे-पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *