पद्मभूषण आण्णा हजारे “जय जवान जय किसान” पुरस्काराने सन्मानित

रोहित खर्गे
विभागीय संपादक
दि १८ मे २०२२

पिंपरी-


महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या सदस्यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन पद्मभूषण समाजसेवक आण्णा हजारे यांना त्यांच्या जन्मदिनी ( १५ जून २०२२) पिंपरी चिंचवडच्या बहिणाई ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, आणि शिंदेशाही पगडी डोक्यावर ठेऊन “जय जवान जय किसान” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा सत्कार सोहळा पार पडत असताना जेष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले अण्णांना म्हणाले हा सत्कार लालबहादूर शास्त्री यांच्या नावाने देत आहोत. त्याला उत्तर देताना अण्णांनी मला मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्रातून अनेक साहित्यिक , कामगार, चळवळीतील नेते कार्यकर्ते अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी राळेगणसिद्धिमध्ये उपस्थित होते. त्यांच्या अतिशय वेस्ततेतूनही या कार्यक्रमास हजेरी लावली. याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शिवाजीराव शिर्के, मनोहर दिवाण, तानाजी एकोंडे, राजेंद्र वाघ, सुरेश कंक, सुभाष चव्हाण,शामराव साळुंखे, आण्णा गुरव, दीपक चांदणे, निशिकांत गुमास्ते, पांडुरंग दोडके, जयश्री गुमास्ते, प्रवीण शिर्के उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *