खा. छत्रपती संभाजीराजेंची गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी आझाद मैदानावर घेतली भेट

प्रसन्न तरडे
बातमी प्रतिनिधी
२८ फेब्रुवारी २०२२

आझाद मैदान, मुंबई 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती श्री. संभाजीराजे भोसले यांनी मुंबईत आझाद मैदानावर शनिवार दि. २६ फेब्रुवारी पासून उपोषण सुरू केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दि. २७ फेब्रुवारी रोजी त्यांची आझाद मैदान येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व संभाजीराजेंना उपोषण मागे घेण्यासंदर्भात विनंती केली. माननीय मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती गृहमंत्र्यांनी खा. संभाजीराजे यांना दिली. मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचेही त्यांना अवगत केले.

मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकार सकारात्मक असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मराठा समाजातील युवक व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विविध शासकीय योजनांमधून राज्य सरकार मदत देऊ करत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेले प्रश्न लवकर सुटलेच पाहिजेत. मात्र छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृती देखील आमच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *