आळे येथील श्री क्षेत्र रेडा समाधी पायी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थाण

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२६ नोव्हेंबर २०२१

आळेफाटा


श्री क्षेत्र आळे येथील वेद बोलविलेल्या रेडा समाधी स्थळाची पायी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थाण नुकतेच झाले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे दिंडी सोहळा बंद होता. परंतु यावर्षी कोरोणा कमी झाल्याने शासणाने दिंडी सोहळ्याला परवानगी दिल्याने आळे (ता.जुन्नर) येथील श्री श्रेत्र ज्ञानेश्वर महाराज देवस्थान च्या दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. या निमित्ताने मंदिरात अभिषेक व विनापुजन ह.भ.प.राजाराम महाराज जाधव व ह.भ.प.रामदास महाराज सहाने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष चारूदत्त साबळे,उपाध्यक्ष अविनाश कु-हाडे, सचिव संतोष पाडेकर,खजिनदार संजय खंडागळे,धनंजय काळे,म्हतुजी काळे,कान्हु पाटील कु-हाडे, बाळासाहेब शेळके,सप्ताह कमिट अध्यक्ष संजय कु-हाडे,महेंद्र पाडेकर, अरूण गुंजाळ,दिपक कु-हाडे,दिगंबर घोडेकर,भगवान सहाने आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान गेली दोन वर्षापासून कोरोणामुळे मंदिरे तसेच दिंडी सोहळा बंद होता .परंतु यावर्षी मंदिरे तसेच दिंडी सोहळा चालु झाल्याने वारक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तर कार्तिकी वारी साठी आळेफाटा येथुन अनेक लहान मोठ्या दिंड्या आळंदीकडे जाताना दिसत होत्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *