महापालिकेकडून जप्तीची कारवाई, दहा वर्षे कर थकवला; आता भरा सहा लाख

पिंपरी प्रतिनिधी
१७ ऑक्टोबर २०२२


तुमच्याकडे २०१२ पासून थकबाकी आहे . आता दहा वर्षे झालीत आम्ही तर मध्यंतरी पैसे भरले होते … ! हो , तेव्हा पाच हजार १७५ रुपये भरले होते . दोन लाख २२ हजार भरायचे होते . आता किती भरायचेत अजून ? सहा लाख १८ हजार रुपये हा संवाद आहे महापालिका कर संकलन विभागातील अधिकारी व मालमत्ताधारकातील त्यांचा व्यापारी गाळा महापालिकेने जप्त करून सील केला त्या वेळेचा. मालमत्ता कर थकबाकीदारांवर महापालिकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे. मात्र, ‘काही होत नाही,’ असे म्हणून वर्षानुवर्षे मिळकतकर न भरलेल्यांचे ऐन सणासुदीच्या दिवसांत धाबे दणाणले आहे

शहरातील ३१ हजार ७१ तब्बल ६३१ कोटींची थकबाकी आहे . मालमत्ताधारकांकडेम्हणजेच सरासरी प्रत्येकी दोन लाख रुपये थकीत आहेत . त्यामुळे इतकी वर्षे महापालिका प्रशासनानेकारवाई का केली नाही ? ऐन सणासुदीच्या काळात कारवाई का केली जात आहे ? इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी का राहिली ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत . आणि कारवाईमुळे अधिकारी व मालमत्ताधारकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत आहेत. थकबाकी असलेल्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केल्यानंतर २१ दिवसांच्या आत कराची रक्कम भरायची आहे . अन्यथा महापालिका त्या मिळकतींचा जाहीर लिलाव करणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *