आंबेगाव तालुक्यात घोडेगाव पोलीस स्टेशन व आमोंङी गावाचा अभिनव उपक्रम

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
७ फेब्रुवारी २०२२

आमोंडी


घोडेगाव पोलीस स्टेशन कडून सर्व ग्रामपंचायतींना गावाच्या सुरक्षिततेसाठी अलार्म सिस्टम व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता.अमोंडी गावामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्या बाबत आग्रह करुन ग्रामस्थांना प्रोत्साहित केले होते.त्याला प्रतिसाद देऊन ग्रामस्थ व तंटामुक्ती समिती यांनी केंद्रीय अलार्म सिस्टम व गावातील मुख्यरस्ते व चौक कव्हर करणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

गावाच्या सुरक्षेसाठी गावामध्ये केंद्रीय अलार्म सिस्टम आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.

अलार्म सिस्टम ही मोबाईल फोन द्वारे ऑपरेट करता येत असून त्याचा फायदा आग लागणे ,चोरी गावातील आणीबाणीच्या गोष्टी ,वनवा लागणे अतिवृष्टी ,वाघ किंवा इतर हिंस्र पशू यांचा धोका इत्यादी बाबत होणार आहे.अलार्म सिस्टम व सीसीटीव्ही कॅमेरे यांचे औपचारिक उद्घाटन खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या हस्ते पार पडले.अशी माहीती घोडेगाव पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *