स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

ज्ञानेश्वर नेहे
बातमी प्रतिनिधी
१४ मे २०२२

भोसरी


स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी एकदाही पराभव स्वीकारला नाही, एकाही लढाईत माघार न घेणारे, तह न करणारे तसेच १२० लढाया लढणारे व त्या सर्वच लढाया जिंकणारे, बाल साहित्यिक म्हणून ख्याती प्राप्त असलेले, अत्यंत कमी वयात बुद्धभूषण, नख शिकांत सातसतक अशा ग्रंथांचे लेखन करणारे व जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी समुद्र बुजावणारे, जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट निर्माते, डोंगर पोखरुन शेतीला पाणी पुरवणारे, आठ भाषावरती प्रभुत्व असणारे असे हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची इंद्रायणीनगर येथे नगरसेवक संजय वाबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगरसेवक संजय वाबळे , उद्योजक चंद्रकांत रासकर , विठ्ठल माने , चंद्रकांत नाणेकर , संजय करगळ , अशोक मोरे , श्रीकृष्ण म्हेत्रे , चंद्रकांत वाघ , लक्ष्मण मानकर , भीमराव लष्करे , बाबा कोळसे, दादा पाटील , अनिल जाधव,अतुल देशमुख ,अमित वाबळे , यश वाबळे , संतोष ढोबळे ,स्वदीप अडसूळ,प्रशांत आदक , आकाश शिंदे , अनिल ब्रम्हांना , मुकेश खनके , विशाल सावंत उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *