प्रजासत्ताक दिनी आंबेगाव तालुक्यातील ब्लू मॉरमॉन फुलपाखरू व शेकरूची प्रतिमा दिल्लीतील चित्ररथाच्या अग्रभागी दिसणार

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२५ जानेवारी २०२२

आंबेगाव


दिल्लीत प्रजासत्ताक दिनी सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथात गौरवशाली आंबेगाव तालुक्यातील ब्लू मॉरमॉन फुलपाखरू व शेकरू ” ही दोन मानके अग्रभागी मिरवणार दिसणार आहेत. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीला होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. यात गौरवशाली आंबेगाव तालुक्यातील “भीमाशंकर” च्या संरक्षित अभयारण्यामध्ये आढळणाऱ्या राज्य फुलपाखरू “ब्लु मॉरमॉन” या प्रजातीच्या फुलपाखराची आठ फुटांची हलती प्रतिकृती अग्रभागी असणार आहे. तसेच आपल्याच भीमाशंकर अभयारण्यात आढळणाऱ्या “शेकरू” या राज्य प्राण्याची देखील प्रतिकृती मध्यभागी ठेवण्यात आलेली आहे.राज्यातील असणारी जैवविविधता जगासमोर यावी ही संकल्पना या चित्ररथातून साकारण्यात आलेली आहे आणि या संकल्पनेत आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर चा संरक्षित अभयारण्यातील “ब्ल्यू मॉरमॉन” फुलपाखरू व “शेकरू” या दोन महत्त्वाच्या मानकांचा समावेश केला गेलेला आहे ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद बाब आहे. यातून आपल्या गौरवशाली आंबेगाव तालुक्याचे देशाच्या जैवविविधतेच्या संदर्भातील असणारे महत्त्व अधोरेखित होते.


महाराष्ट्र हे जैवविविधतेने संपन्न असे राज्य असून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देखील महाराष्ट्र आघाडीवर आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा समावेश आहे. तसेच राज्य शासनाने राज्यातील प्राणी, पक्षी