भोसरीच्या नगरसेविका अनुराधा गोफणे यांच्या तत्परतेमुळे महिलेचे हरवलेले ४९००० रुपये मिळाले परत

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ जानेवारी २०२२

भोसरी


बुधवार दि १९ जानेवारी रोजी दुपारी  दोन वाजता  सौ. सानिया शेख  प्रभाग क्र ५ गवळी नगर येथील  गुळवे नगर हौंसीग सोसायटी , जयमहाराष्ट्र चौक  भोसरी  आळंदी रोड येथुन जात असताना त्यांच्या हातातून नकळत पैसे असलेली पर्स रस्त्यात पडली. ही गोष्ट त्यांच्या लक्षात पुढे गेल्यावर आली. एव्हडी रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे लक्षात आलेवर त्यांना काहीच सुचेना काय करावे याच विचारात त्या रस्त्याच्या कडेला बसल्या.

अशावेळी काय करावे याचा विचार करत असतानाच एव्हडी रक्कम गेल्याने रडू कोसळले त्यांनी रडत रडतच त्या प्रभागाच्या नगरसेविका अनुराधा गोफणे यांना फोन करून घडलेली सर्व हकीकत सांगितली. गरीब महिलेवर मोठा प्रसंग कोसळला होता व ती कहाणी ऐकून नगरसेविका गोफने तात्काळ घटनास्थळी पोहचल्या. त्या भागातील रहिवाशी संतोष वळसे यांच्या इमारतीवरील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज तपासणी केली त्यात दोन मुले रस्त्यावर पडलेली ती पर्स घेवून जाताना दिसली. त्या मुलांचा फुटेजच्या आधारे आजुबाजुच्या परिसरात माग काढत  शास्त्री चौक येथील मोकळ्या जागेत झोपडी टाकुण राहत असलेल्या  त्या दोन मुलांचा शोध घेतला. त्यांच्याकडे चौकशी केली असता अगोदर उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात येताच अनुराधा गोफने यांनी त्या मुलांना खडसावून विचारले व त्यांना ते फुटेज दाखवले. पोलिसांचा धाक दाखवला असता  त्या मुलांनी रस्त्यावर पडलेली पर्स सापडली आसलेचे कबुल केले.

महिलेची हरवलेली पर्स आकाश लक्ष्मण पवार या मुलाकडुन पर्स  मधील रोख रक्कम ४९०००/-  इतर दस्तऐवज  आधार कार्ड , पॅनकार्ड, एटीएम  कार्ड मोबाईलसह परत मिळाले. त्या  मुलाला  नगरसेविका गोफने यांनी स्वतः स्वखुशीने  रोख रक्कम ५०० रु बक्षीस दिले. आपले पैसे आणि महत्वाची कागदपत्रे मिळाल्याने फोन वरुन रडत आसणा-या त्या शेख ताईच्या चेह-यावर हास्याची लकेर उमटली. आणि ते हास्य पाहुन नगरसेविका अनुराधा गोफने यांना वेगळेच समाधान मिळाले. नगरसेविका गोफने यांनी तत्परता दाखवत त्या महिलेचे पैसे व महत्वाची कागदपत्रे मिळवून दिल्याने प्रभागातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *