गावो गावी जाऊन जिल्ह्यातील गावांची साफ सफाई करणार – हरिभाऊ उगले

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
११ जानेवारी २०२२

खामुंडी


जुन्नर तालुक्यातील खामुंडी या गावात हरिभाऊ उगले यांनी संपूर्ण गावाची साफ सफाई केली आहे. त्यांच मूळ अकोले तालुक्यातील डोंगरगाव ता.अहमदनगर येथील असून आत्ता पर्यंत त्यांनी तब्बल ३६जिल्ह्यात जाऊन थोर समाज सुधारक संत गाडगे बाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावांची साफ सफाई केली आहे.आपल्या मुलांना त्यांनी शेतकरी म्हणून आपण गेले चाळीस वर्ष शेतीत काम केले म्हणून शेतीच्या कामातून सेवा निवृत्त करा असा अर्ज देऊन गावा गावांची साफ सफाई करण्याचा निर्धार केला आहे.आपल्या दुचाकीवरच झाडू बादली खराटा असे अनेक साफ सफाई चे साहित्य घेऊन हे प्रवास करत गावा गावांची साफ सफाई करत चालले आहेत. खामुंडी गावात सफाई केल्या नंतर उगले यांचा गावच्या वतीने सन्मान करत त्यांचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.या प्रसंगी खामुंडी गावचे सरपंच वनराज शिंगोटे,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा ओतूर चे विकास अधिकारी संदीप जाधव,सोसायटी चे चेरमन सोपान कोकाटे व्यवस्थापक बबन मुरादे ,राजाराम डुंबरे,संदीप गंभीर, बाळशीराम डुंबरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *