वारूळवाडी व नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोविड लसीकरण मोहिमेत ३२०० जणांना लस

नारायणगाव च्या वतीने वतीने १ हजार ८०० जणांना तर वारूळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने १ हजार ४०० जणांना लस

नारायणगाव : (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) – बजाज ग्रुप व जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र, नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दि ३१ रोजी आयोजित कोविड लसीकरण मोहिमेत सुमारे ३ हजार २०० जणांना कोविशील्डचा पहिला डोस देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ, नारायणगावची सरपंच योगेश पाटे व वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर यांनी दिली .

या लसीकरण मोहिमेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके ,पंचायत समिती सभापती विशाल तांबे , तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ उमेश घोडे , विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे ,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ, विस्ताराधिकारी के बी मोरे, तलाठी संजय सैद ह्या कार्यक्रमाचे आयोजन वारूळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, जंगल कोल्हे, ज्योती संते, स्नेहल कांकरिया, शुभांगी कानडे, वैशाली मेहेर, राजश्री काळे ,ग्राम विकास अधिकारी सतीश गवारी, नितीन नायकरे, संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, सचिन वारुळे, गणेश वाजगे,अतुल आहेर,ईश्वर अडसरे ,विकास फुलसुंदर ,पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे ,प्राथमिक शाळेचे शिक्षक,आशा वर्कर,कोरोना ग्राम सुरक्षा कमिटी सदस्य , प्राथमिक आरोग्य केंद्र, नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते .

नारायणगाव व वारूळवाडी ग्रामस्थांसाठी पहिल्या टप्प्यात लसीकरण उपक्रम राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या सहकाऱ्याने ३ हजार २०० डोसचा उपक्रम राबविण्यात आला आहे .

फोटो – वारूळवाडी येथे कोविड लसीकरण मोहिमेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी आशाताई बुचके,राजेंद्र मेहेर ,डॉ वर्षा गुंजाळ व मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *