पोलिस कर्मचारी निवासस्थान सदनिका आणि राखीव पोलिस निरीक्षक कार्यालय इमारतीचे उद्घाट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२१ डिसेम्बर २०२१

जळगाव


जळगाव येथे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई यांच्याकडून बांधण्यात आलेल्या २५२ पोलिस कर्मचारी निवासस्थान सदनिका आणि राखीव पोलिस निरीक्षक कार्यालय इमारतीचे उद्घाटन आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच पोलिस कर्मचाऱ्यांना घराची चावी प्रदान करण्यात आली. तसेच त्यांच्या हस्ते पोलिस मुख्यालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

आज २५२ सदनिकांचे वितरण करताना मला खूप आनंद होत आहे. ह्या सदनिका सुसज्ज असून बांधकामाचा दर्जादेखील चांगला आहे. घर चांगले असेल तर कुटुंब आनंदी राहते आणि साहजिकच याचा सकारात्मक परिणाम पोलिसांच्या कामावर होईल, असे गृहमंत्री म्हणाले. सदनिकांच्या दुसर्‍या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचा विकास करताना प्राधान्यक्रमानुसार पोलिस स्टेशनचा दर्जा वाढविण्याबाबतही विचार करण्यात येईल, असे ते म्हणाले.

राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारकरीत्या काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडीचणी, समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्या सोडविणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याने त्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन यावेळी गृहमंत्र्यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *