देवदेवतांची वाटणी करणे हे सांस्कृतिक पापच – डॉ.सबनीस

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२ नोव्हेंम्बर २०२१

पिंपरी


देव-देवत्व हे मानव जातीला जोडणारे संचित आहे.मात्र मानवाने जगाच्या कल्याणासाठी कार्य करणारे देव, साधू संत आणि महापुरुषांना आपल्या सोयीनुसार जातीच्या चौकटीत बंदिस्त केले. देवदेवतांची वाटणी करणे हे संस्कृतीचे पाप आहे.असे परखड मत अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. शब्द पब्लिसिटी निर्मित धनश्री दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ सबनीस यांच्या हस्ते पिंपरी येथील आयपीएस कॅंपस मध्ये करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी डॉ डीवायपाटील शैक्षणिक संकुल आकुर्डीचे संचालक डॉ.नीरज व्यवहारे,कुदळे ग्रूपचे अध्यक्ष डॉ.दीपक कुदळे,एएसएम संचलित आयपीएस कॅंप्सचे संचालक डॉ. सुधाकर बोकेफोडे, धनश्री दिवाळी अंकाचे संपादक शिवाजी घोडे आदी उपस्थित होते. यावेळी शब्द पब्लिसिटीच्या वतीने ७०% विकलांग असलेल्या पृथ्वीराज इंगळे या स्पेशल गायकास मास्टर ब्लास्टर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. दीपक कुदळे यांनी संपादक शिवाजी घोडे व रेखा घोडे या दांपत्याचा विशेष सन्मान केला.

डॉ.सबनीस पुढे म्हणाले कि, दिवाळी अंका बाबतीत बोलताना म्हणाले कि, अंकामध्ये सर्वसमावेशक माहितीपर लेख आहे. या अंकामध्ये कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे मुल्यमापन केले आहे.लक्ष्मण कांबळे या ऊसतोड कामगार ते उद्योजकपर्यंत प्रवास करणारा हा या अंकाचा नायक आहे.तर रेखा घोडे यांनी संशोधन करून लिहिलेला “आदिशक्ती- मातंगी माता” हा लेख मनाला भावणारा आहे. भविष्यवाणीवर मि विश्वास ठेवणारा नाही पण त्याला एक वेगळा वाचकवर्ग आहे.वाचकांना अपेक्षित सर्वसमावेशक अंक देण्याचा प्रयत्न संपादक शिवाजी घोडे यांनी केला आहे.अशा प्रकारे त्यांनी अंकाचे विश्लेषण केले. डॉ.नीरज व्यवहारे म्हणाले कि,गुगलवर माहिती आहे ज्ञान नाही.ज्ञान प्राप्तीसाठी शिक्षक,लेखक, संतवाणी,किंवा पुस्तकाच्या सान्निध्यातच रहावे लागेल. कुदळे म्हणाले कि, पूर्वी आम्ही वाचक दिवाळी अंकाची वाट पाहत असे.

इंटरनेटच्या जगात परिस्थिती बदली आहे.दिवाळी अंक काढणे अत्यंत अवघड बनले आहे. वाचकांची भूक भागवण्या साठी अंक काढणे हि एक सामाजिक जबाबदारी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे यांनी केले.सूत्रसंचालन अमोल मोरे तर आभार धनश्री घोडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कामगार नेते काशीनाथ नखाते,रेखा घोडे,श्रीकृष्ण पादिर,बाबा शिंदे,विशाल फडतरे दत्ता गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *