ज्येष्ठ पत्रकार इस्माईल सय्यद यांचे निधन

किरण वाजगे 
कार्यकारी संपादक
७ डिसेंबर २०२१

जुन्नर


निर्मळ मनाचा दिलदार सखा हरपला – अतुल परदेशी

जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य व दैनिक पुण्यनगरी, जनप्रवास, गावकरीचे जुन्नरचे पत्रकार ईस्माईल उर्फ बच्चूभाई सय्यद यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक ६ रोजी सायंकाळी जुन्नर येथे दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.पत्रकार बच्चुभाई सय्यद यांच्या निधनाचे वृत्त समजतात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष व आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी सय्यद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले की, बच्चुभाई इतक्या अचानक आपल्यातून गेले ही बाब खूपच वेदनादायी आहे,अत्यंत हसतमुख, आदर्श पत्रकार मित्र आज आपण गमावला आहे, निर्मळ मनाचा दिलदार सखा हरपला, सय्यद परिवाराच्या दुःखात आपण सहभागी आहोत. बच्चूभाईना भावपूर्ण श्रद्धांजली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *