अ.भा.म. साहित्य परिषद पुणेच्या पुणे विभाग प्रसिद्धी प्रमुख पदी राजेंद्रकुमार शेळके , संगिता लंघे यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी तर संगिता काळभोर यांची पुण जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी,ओझर
८ नोव्हेंबर २०२१

ओझर


नारायणगाव येथील कवी लेखक व पत्रकार श्री.राजेंद्रकुमार ज्ञानेश्वर शेळके यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणेच्या पुणे विभाग प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आल्याचे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांनी नियुक्ती पत्राद्वारे कळविले. साहित्य क्षेत्रातील श्री.राजेंद्रकुमार शेळके यांच्या भरीव योगदानाबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने विशेष दखल घेऊन त्यांची हि नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोरेगाव भिवर येथील मुख्याध्यापिका कवियत्री संगीताताई लंघे यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी तर लोणी काळभोर येथील संगीताताई काळभोर यांची पुणे विभागीय कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अ.भा.म. साहित्य परिषद पुणेच्या पुणे विभाग प्रसिद्धी प्रमुख पदी राजेंद्रकुमार शेळके , संगिता लंघे यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी तर संगिता काळभोर यांची पुण जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

श्री.राजेंद्रकुमार शेळके हे गेली अनेक वर्षे कवी लेखक पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,विडंबनात्मक, इतर काव्यप्रकारात काव्यलेखन केले आहे.राजेंद्रकुमार शेळके यांच्या अनेक कविता, वर्तमानपत्रे,मासिकात व पुणे आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झाल्या आहेत. श्री.राजेंद्रकुमार शेळके यांना साहित्य विश्वात अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल जुन्नर येथील प्रसिद्ध कवी इंजिनिअर शिवाजीराव चाळक,निवेदक कवी संदीप वाघोले,ऍड. जयराम तांबे,कोल्हापूर पन्हाळा तालुका अध्यक्ष कवियत्री अश्विनी मेंगाणे, आंतरराष्ट्रीय मानसोपचार तज्ञ कवियत्री डॉ.अलकाताई नाईक , अकोले येथील कवी मित्र पत्रकार रमेश खरबस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे,पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष व आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी,ज्येष्ठ ग्रामीण कथाकार बबनराव पोतदार इतर सर्व मान्यवर सारस्वतांनी श्री.शेळके यांचे अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *