दिंडी सोहळ्यातील भक्तिरसात न्हाऊन निघाले बालक मंदिरचे वारकरी

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
०८ जुलै २०२२

ओझर


विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी,आपल्या संस्कृतीचे पुढच्या पिढीत जतन व्हावे म्हणून शुक्रवार दि. 08/7 /2022.रोजी ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती एस.आर.केदारी बालक मंदिर मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी असा जयघोष करत शाळेचे विद्यार्थी मनोभावे दिंडीत सहभागी झाले होते.अनेक संतांच्या व विठोबा रखुमाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांना पाहून प्रत्यक्ष पंढरपूरचे दर्शन घडले.विद्यार्थ्यांनी नृत्य, अभंग व भारुड सादर केले.

या कार्यक्रमाला ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त श्रीमती नंदाताई डांगे मॅडम,डॉ. श्रीकांत विद्वांस सर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न, कृषिभूषण अनिल तात्या मेहेर सर ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रवींद्र पारगावकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह व बालक मंदिरचे चेअरमन अरविंदभाऊ मेहेर सर,ग्रामोन्नती मंडळाचे संचालक शशिकांत वाजगे सर, बालक मंदिर समितीच्या सदस्या मा. सौ मोनिकाताई मेहेर मॅडम, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक मा.श्री. रमेश जुन्नरकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे सदस्य मा. श्री. देविदास भुजबळ सर, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम, शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. अरुणा कानडे मॅडम उपस्थित होत्या.या दिंडी सोहळ्या निमित्त इयत्ता तिसरीतील कु. अगम्या प्रवीण शिंदे हिने ‘आज सोनियाचा दिनू ‘ हा ज्ञानेश्वरांचा अभंग सादर केला.इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी अशी पंढरी पंढरी विठूरायाची नगरी या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले.

इयत्ता चौथीतील प्रणव निलेश नेवकर याने ‘स्त्री शिक्षणावर आधारित वारकरी भारूड ‘ सादर केले, त्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गाण्यांवर सुंदर नृत्य सादर केले.मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. शाळेतील सौ.घाडगे मॅडम व सौ. भालेराव मॅडम यांनी आरती म्हटली.

इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी रिंगण घातले त्यानंतर मान्यवर पाहुणे, पालक , शिक्षिका व विद्यार्थिनींनी रिंगणात फुगड्या घातल्या व कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.शाळेतील संगीत शिक्षक श्री. राहुल दुधवडे सर यांनी अभंग सादर केले.शाळेतील शिक्षिका कु. अर्चना करंडे मॅडम यांनी पसायदान घेऊन वातावरण प्रभूमय केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.खडीसाखर व लाडू देऊन प्रसाद वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मानसी पवार मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले .अशाप्रकारे भक्तिमय वातावरणात शाळेतील दिंडी सोहळा चा कार्यक्रम पार पडला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *