आयुक्त राजेश पाटील यांचा राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे यशवंत भोसले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार

रोहित खर्गे
विभागीय संपादक
४ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


पिंपरी चिंचवड चे आयुक्त राजेश पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संघटनेचे बोधचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जीवाची बाजी लावणारे अतिशय प्रामाणिक आयुक्त या शहराला लाभले याचा आम्हांला गर्व असल्याचे भोसले यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने २००८ साली एक अद्यादेश काढला आहे. त्याप्रमाणे महापालिकेत स्थानिक ८०% भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे. त्याची अंमलबजावणी करावी. आपल्या महापालिकेत जवळपास ३ हजार ८०० च्या वर रिक्त जागा आहेत त्या भरल्या नाहीत. या रिक्त जागांवर स्थानिक भूमिपुत्रांना त्वरित नोकरी द्यावी.

आयुक्त राजेश पाटील यांचा राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे यशवंत भोसले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार

तसेच कोरोना काळात मानधनावर काम करणाऱ्या कामगारांना सेवेत कायम करावे. रोजगार टिकवण्यासाठी न्यायालयीन लढाई चालू ठेऊन कामगार काम करत आहेत. आयुक्तांनी कंत्राटी ३५० कामगारांना पूर्ववत कामावर घेतले आहे. त्याबाबत त्यांचे आभार मानले. महापालिकेने रिक्त जागा भरण्याबाबत पावलं उचलले असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे सांगितले.
कोरोना नंतर आता परस्थिती पूर्ववत पदावर येत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे भीतीचे वातावरण शहरात होते. सर्वांची दिवाळी अतिशय आनंददायक व भरभराटीची जावो अशा दिवाळीच्या शुभेच्छा शहरातील नागरिकांना भोसले यांनी दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *