नवनियुक्त सरपंच गोरक्षनाथ वाघ यांची कामाला जोरदार सुरवात…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी 10/05/2021

बेल्हे:- नवनियुक्त सरपंच गोरक्षनाथ वाघ यांची कामाला जोरदार सुरवात

विभागीय संपादक रामदास सांगळे

बेल्हे (ता.जुन्नर) गावचे नवनियुक्त सरपंच गोरक्षनाथ (गोट्याभाऊ) वाघ यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारून कामाला जोरदार सुरुवात केली आहे.अनेक दिवसांपासून गावच्या वेशी जवळ पडलेला कचरा आज जेसीबी च्या साहाय्याने उचलून परिसर स्वच्छ केला.काही महिन्यांपासून बंद असलेल्या बेल्हे एसटी स्टँड वरील स्वच्छतागृहांची साफसफाई करून दुरुस्ती करून चालू केले. तसेच जीर्ण झालेल्या बस स्थानकाच्या बोर्ड चे नूतनीकरण केले. स्थानकाजवळील स्वच्छता केली.गावातील विविध रस्त्यांवरील बंद असलेले पथदिवे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात होते. ते सर्व स्वतः उभे राहून व्यवस्थितपणे साफसफाई करून घेतली.गोट्याभाऊ वाघ यांना पुर्वीपासून सामाजिक कार्याची आवड असल्याने कोणत्याही कामात ते स्वतःला झोकून देऊन काम करतात. तरुण सरपंच असल्याने त्यांना गावातील तरुणाचीही चांगली साथ मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *