प्राचार्य सतिश वाघमारे यांच्या “जिम मार्गदर्शन” या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा उत्साहात संपन्न

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१९ ऑक्टोबर २०२१

ओझर


विद्यार्थी दशेतच मुला-मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ते भविष्यात सुसंस्कृत नागरिक व्हावेत ही काळाची गरज ओळखून सरस्वती मंदिर संस्थेचे ‘पूना नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स’ मध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करण्यात आला. दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम संस्थेच्या A.V. हॉलमध्ये इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसमवेत पार पडला. कोमल किरवे (इ.१०वी) व प्रतिक्षा साळुंके (इ.११ वी) या विध्यार्थीनींनी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची माहिती सर्वांना सांगितली. त्यानिमित्त प्रशाले तर्फे त्यांना अवांतर वाचनाची पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्राचार्य श्री.सतीश नारायण वाघमारे लिखित ‘जिम मार्गदर्शक’ या पुस्तकाचे प्रा.विनीत निर्मळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

व्यायाम कधी,कसा व का करावा?  याचे अगदी सोप्या पद्धतीने सादरीकरण श्री. वाघमारे सरांकडून करण्यात आले. सध्या तरुण-तरुणींमध्ये जिमला जाऊन शरीर संतुलित राखण्याची क्रेझ दिसते.त्यावर जिम मार्गदर्शक (Gym trainer) त्यांना वजनानुसार आहार कमी-जास्त घेण्याचा सल्ला देतात व जिममध्ये येणाऱ्या सर्वांना एकसारखाच व्यायाम (work out) करायला सांगितला जातो. सरांच्या म्हणण्यानुसार हे पूर्णपणे चुकीचे असून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या शरीरानुसार व्यायाम, आहार तसेच शारीरिक व मानसिक विश्रांतीची आवश्यकता असते.त्याप्रमाणेच जिम मार्गदर्शकांनी त्यांचा work out निश्चित केला पाहिजे.या अनुषंगाने सर्व जिम मार्गदर्शकांनी व व्यायाम करणाऱ्या सर्वांनी या पुस्तकाचे अभ्यासपूर्ण वाचन करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे,असे मत श्री. वाघमारे सरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती व सहकार्य लाभले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *