लोकहितार्थ भ्रष्टाचार मुक्त झालेली दहा कामे दाखवा, परत पिंपरी-चिंचवड शहरात पाय ठेवणार नाही – खासदार डाॅ.अमोल कोल्हे

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१७ ऑक्टोबर २०२१

पिंपरी-चिंचवड


महानगरपालिका,पालिका यांच्या होणा-या निवडणूकांची धामधूम आता सुरू झाल्याचे दिसत आहे. शनिवार दि.१७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आले होते. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी ही उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधा-यांवर हल्लाबोल केला.
देशभरामध्ये पेर्टोल डिझेल चे भाव हे वाढले असून कोवीड च्या काळात सर्वांना मोफत लस दिल्याने हे भाव वाढ झाले असल्याचे समोर आले आहे. या आधी ह्या राज्यात ज्यांनी सत्तर वर्ष सत्ता भोगली त्यांच्याही काळात अनेक आजारानी डोके वर काढले परंतु त्या काळात त्या सरकारने कधी जनतेच्या खिशावर डल्ला नाही मारला. हे आताचे सरकार पेट्रोल डीझल ची वाढ करून तुमच्या आमच्या खिशावर डल्ला मारत आहे.आणि म्हणूनच याला विरोध करण्यासाठी आज 80 वर्षांचा तरूण योद्धा शरद पवार हे मैदानात उतरले आहे. २०१७ साली पिंपरी-चिंचवड शहराच्या झालेल्या निवडणुकांमध्ये आताच्या सत्ताधारी यांनी अश्वासनांचा पाऊस पाडला आणि आज जनतेला गाजर दाखवले आहे.

शहराचे दोन भाग करून सत्ताधा-यांनी स्वताची मक्तेदारी वाढवली आहे

पिंपरी-चिंचवड शहराचा खरा विकास हा २०१७ च्या आधी झाला आणि या शहरात केवळ राज्यातून नाही तर देशभरातून लोक पोटाची खळगी भरण्यासाठी आले आहे.आज पिंपरी-चिंचवड शहरामध्ये उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून विदर्भ मराठवाडा खान्देश येथूनही काही रोजगार आले असून ते आपली उपजीविका भागवत आहे आणि हा रोजगार 2017 च्या आधी शरद पवार यांनी निर्णय करून दिला असल्यानेच आज पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला आहे.
शहरात असणारे चकचकीत रस्ते, उड्डाण पूल,शहराचा बदलेला विकासाचा चेहरामोहरा हा केवळ अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीतून झाले विकास आहे. म्हणूनच अजित दादा पवार हे पिंपरी-चिंचवड शहराला तळ हातच्या फोडा प्रमाणे जपतात असा उल्लेख ही आपल्या भाषणात डाॅ.अमोल यांनी केला.

लोकहितार्थ भ्रष्टाचार मुक्त झालेली दहा कामे दाखवा, परत पिंपरी-चिंचवड शहरात पाय ठेवणार नाही – खासदार डाॅ.अमोल कोल्हे

२०१७ नंतर आताच्या सत्ताधारी यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही सोडविता आला नाही. केवळ निवडणुकीत दिलेली आश्वासनांचे गाजर आणि आता होत असलेल्या कामात भ्रष्टाचार हेच काम सत्ताधारी करीत आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे दोन भाग करून आपली मक्तेदारी सत्ताधारी वाढवीत असल्याचा हल्लाबोल ही खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *