कर्तृत्ववान शिक्षकरत्न पुरस्कार प्रा.रतीलाल बाबेल यांना प्रदान

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२३ सप्टेंबर २०२१

नारायणगाव 

मागील दिड वर्षात कोरोना कालावधीमध्ये शैक्षणिक सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. रतीलाल बाबेल यांचा राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य तसेच महाज्योती, नागपूरचे संचालक बबनराव तायवाडे यांच्या हस्ते राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षकरत्न पुरस्कार देऊन रविभवन, नागपूर येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ, नागपूर विभाग, नागपूर यांचे वतीने “राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षकरत्न पुरस्कार” वितरण सोहळा रवीभवन सभागृहात, रविनगर, नागपूर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, नागपूरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे तसेच शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष, मिलिंद वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील प्रतिभावान २२ शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले.

रतीलाल बाबेल हे ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरात गेली २८ वर्षा पासून विज्ञान व गणित विषयांचे अध्यापन करीत असून १०० टक्के निकालाची परंपरा त्यांनी जपली आहे. जिल्हात तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. विज्ञान संघामार्फत त्यांनी विज्ञान प्रसाराचे कार्य केले आहे. अनेक विद्यार्थांना राज्य शिष्यवृत्ती साठी मार्गदर्शन केले आहे.

जुन्नर तालुका विज्ञान संघामार्फत त्यांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, शैक्षणिक सहलींचे आयोजन, ओझोन दिनानिमित्त निबंध, चित्रकला स्पर्धा घेतल्या आहेत. विज्ञान शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी म्हणून विज्ञानमित्र व विज्ञाननिष्ठ शिक्षक पुरस्कार देऊन अनेकांचा गौरव केला आहे.
नुकताच त्यांना तंत्रस्नेही गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुणे आणि राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार, नाशिक प्राप्त झाला आहे.

या निवडीबद्दल विज्ञान संघाचे सल्लागार डॉ.जे.के. सोळंकी, समर्थ संस्था बेल्हे चे विश्वस्त प्रा.वल्लभ शेळके, ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे अध्यक्ष प्रकाश पाटे,कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, सर्व पदाधिकारी ,जैन सकल संघ,नारायणगाव,जैन सोशल क्लब,नारायणगाव, जुन्नर तालुका विज्ञान संघाचे व जुन्नर तालुका गणित संघाचे सर्व पदाधिकारी,स्व.रामचंद बाबेल ट्रस्टचे अध्यक्ष जे.सी.कटारिया, उपाध्यक्ष जयप्रकाश बाबेल,खजिनदार अशोक बाबेल,सर्व पदाधिकारी,गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिराचे मुख्याध्यापक रविंद्र वाघोले व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *