गोरगरिबांना साडीचोळी देऊन श्री शिवछत्रपती मंडळाचा साधेपणाने नवरात्रोत्सव

किरण वाजगे
कार्यकारी संपादक 
१४ ऑक्टोबर २०२१ 

नारायणगाव 

नारायणगाव येथील श्री छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने गोरगरिबांना साडीचोळी देऊन साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला.मंडळाचे हे ३४ वे वर्ष असून नवरात्रोत्सवाचे साधेपणाने, उत्साहात व भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे संस्थापक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अनिल दिवटे, अध्यक्ष रोहिदास वाजगे, नित्यानंद नेवकर, रविंद्र कोडीलकर, शरद कदम आणि मंडळाच्या सभासदांनी नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा

मंडळाने यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून दररोज होणाऱ्या रास दांडिया, गरबा या गर्दीच्या कार्यक्रमांना फाटा देवून नारायणगाव मधील आदर्श असलेल्या या मंडळाने गरीब कुटुंबातील महिला भगिनींना साडी चोळी वाटप केले. रोजच्या आरती चा मान देखील तरुण नवविवाहित जोडप्यांना दिला आहे. यावर्षी अंबिका माता देवीची नवनवीन रूपे साकारली आहे. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी कुलस्वामिनी अंबाबाई, तुळजापूरची भवानीमाता, माहुरगडची रेणुका माता, वनीच्या सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी माता अशी वेगवेगळ्या रुपात देवीची पूजा बांधली. बुधवार दि.१३/१०/२०२१ रोजी अष्टमी निमित्त नवचंडी होमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *