शब्द शंकरपाळी साहित्य समूहाचा बक्षीस समारंभ संपन्न

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
११ ऑक्टोबर २०२१

ओझर

मराठी साहित्य क्षेत्रातील एक अग्रगण्य साहित्य समूह म्हणून ज्याची ओळख आहे असा समूह म्हणजेच शब्द शंकरपाळी साहित्य समूह, मुंबई आयोजित बक्षीस समारंभ आणि स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेल्या महास्पर्धेचा निकाल लागूनही बक्षीस समारंभ कोरोना निर्बंधांमुळे स्थगित करण्यात आला होता तो काल निर्विघ्नपणे आणि उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमास आरती सशितल, प्रज्ञा दळवी, अवंतिका महाडिक, मृगनयना भजगवरे, रोशन भोईर आणि भूषण तांबे हे उपस्थित होते.या कार्यक्रमास विजेत्या स्पर्धकांनी आवर्जून हजेरी लावली तर काही स्पर्धकांना दूरचा प्रवास असल्या कारणाने शक्य झाले नाही.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला या संस्थेचे समूह संस्थापक माननीय भूषण सहदेव तांबे यांनी समूहाबद्दलची थोडक्यात माहिती आणि उद्दिष्टे स्पष्ट केली ,आणि भविष्यातील उपाय योजना बद्दल सविस्तर माहिती देऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच समूहातर्फे अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था देखील अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आली. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली आणि पुढील महिन्यात प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषांकाला शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *