अवैद्य गुटखा वाहतूक करणारा इसम स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
११ ऑक्टोबर २०२१

नारायणगाव

गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमास जुन्नर येथून ताब्यात घेऊन अवैध गुटख्यासह एकूण ४ लाख ७४ हजार ७८० रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे विभागाने जप्त केला. अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिलीमनोज बाळशीराम वाणी (वय २९ वर्ष रा.पिंपळगाव तर्फे नारायणगाव ता.जुन्नर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अवैध रीतीने सुरू असलेल्या गुटखा आणि इतर अमली पदार्थ यांच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी खास मोहीम राबवली होती.त्या संबधीच्या सूचना आणि आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या त्यानुसार दि ९ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक खेड जुन्नर विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरिक्षक नेताजी गंधारे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एकनाथवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे) या ठिकाणी सिबाका हॉटेल च्या जवळ एक संशयित इसम हा पांढऱ्या रंगाच्या मारुती सुजूकी सुपर कॅरी या वाहनात बसलेला असून सदर वाहनात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आहे. त्यानुसार गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील वाहन क्र.एम एच १४ जे एल ०४२२ या वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आणि पानमसाला मोठ्या प्रमाणात मिळून आला.

सदर इसमाच्या ताब्यातून गुटखा पानमसाला आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन जप्त करून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक विकास जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर,पोलीस मित्र प्रसाद पिंगळे,जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शंकर तळपे, गणेश जोरी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *