वाल्हेकरवाडी येथील अल्टिमेट मार्शल आर्टस विजेते तर आयर्न मार्शल आर्ट उपविजेते

रोहित खर्गे
विभागीय संपादक
ऑक्टोबर २०२१

पिंपरी

पिंपरी चिंचवड किकबाॅक्सिंग असोसिएशनच्या वतीने दि.३ ऑक्टोबर रोजी नेहरूनगर, पिंपरी येथे नुकत्याच जिल्हास्तरीय किकबाॅक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेचे आयोजन संत तुकाराम नगरमधील आर्यन्स मार्शल आर्ट्स या संस्थेने केले होते. सदर स्पर्धेत संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील विविध संस्थेच्या 414खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेत वाल्हेकरवाडी येथील अल्टीमेट मार्शल आर्ट्स या संघाने स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर संत तुकाराम नगर येथील आर्यन्स मार्शल आर्ट्स या संघाने उपविजेतेपद पटकावले, वाकड येथील आर्या मार्शल आर्ट्स या संघाने तिसरा क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेतील विजयी खेळाडूंची आगामी दि. २४ ऑक्टोबर रोजी कान्हे फाटा, वडगांव मावळ येथे होणार्या राज्यस्तरीय किकबाॅक्सिंग स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड संघात निवड करण्यात आली आहे.

सदर स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक राहुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनिल यादव, वाको महाराष्ट्र या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष संतोष म्हात्रे,पिंपरी चिंचवड किकबाॅक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रवी गायकवाड, सचिव इक्बाल शेख,आर्यन्स मार्शल आर्ट्सचे अध्यक्ष सागर रेवाळे आदि उपस्थित होते. सदर स्पर्धेत पंच म्हणून मोईन बागवान, सचिन बनसोडे, उमा काळे,अभिषेककुमार शाॅ, विजय ढोबळे, परवेज शेख, यश वाल्हेकर, खुशी रेवाळे, वैदेही पवार, पुजा वाल्हेकर,ऑस्टीन राॅड्रीक्स, सागर पवार आदिंनी काम पाहिले.उपस्थित मान्यवरांनी विजयी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *