पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचा वार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

रोहित खर्गे
विभागीय संपादक
५ ऑक्टोबर २०२१

पिंपरी 

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचा वार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर:

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. ३०/१०/२०२१ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम:
दि. ०४/१०/२०२१ ते १३/१०/२०२१ नवीन सभासद नोंदणी.
दि. १४/१०/२०२१ मतदार यादी
दि. १६/१०/२०२१ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.
दि. १८/१०/२०२१ ते २०/१०/२०२१ उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृती.
दि. २१/१०/२०२१ उमेदवारी अर्जाची छाननी.
दि. २५/१०/२०२१ पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी.
दि. २६/१०/२०२१ उमेदवारांचे मनोगत
दि. ३०/१०/२०२१ मतदान, मतमोजणी व निकाल.

सदरच्या निवडणुकीसाठी ॲड. सुभाष चिंचवडे, ॲड. उत्तम चिखले, ॲड. देवराव ढाळे, ॲड. सुशिल मंचरकर, ॲड. विजय शिंदे, ॲड. संजय दातीर – पाटील, ॲड. अनील तेजवानी, ॲड. विलास कुटे, ॲड. सुहास पडवळ यांची निवडणूक कमिटी निवडणुक कामकाज पाहणार आहेत. पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन चे १२५० आजीव सभासद असून संघटनेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, हिशोब तपासणीस व सभासद या पदांकरिता निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *