पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घ्या ,सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरेंची आयुक्तांकडे मागणी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१९ ऑक्टोबर २०२१

पिंपरी


पुनावळे येथे २० वर्षापूर्वी कचरा डेपोचे आरक्षण टाकून काही बिल्डर व राजकारणी लोकांनी पुनावळे व आजूबाजूच्या गावांचे जमिनीचे भाव पाडले . त्यानंतर याच बिल्डरांनी व राजकारणी लोकांनी हजारो एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केली . त्यानंतर प्रशासनाला हाताशी धरून कचरा डेपोची जागा ताब्यात घेण्यास २० वर्षे विलंब केला . त्यामुळे आयुक्त साहेब आपण अशा बिल्डर व राजकारणी लोकांचा डाव पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेवून उधळून लावा . मोशी कचरा डेपोची क्षमता संपली आहे.

कचरा डेपोचे आरक्षण टाकून काही बिल्डर व राजकारणी लोकांनी पुनावळे व आजूबाजूच्या गावांचे जमिनीचे भाव पाडले

पुनावळे येथे ७४ एकर वनखात्याची जमिनीवर कचरा डेपोचे आरक्षण आहे. या जमिनीच्या मोबदल्यात शासनाला अंदाजे ४ कोटी रुपये देण्यात आले आहेत . तसेच पिंपरी सांडस येथे वनविभागाला पर्यायी जागा देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आयुक्तसाहेब आपण लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून हि ७४ एकर जागा ताब्यात घ्यावी . आत्तापर्यंत २० वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे जे आयुक्त होऊन गेले ते हि जागा ताब्यात घेवू शकले नाही . परंतु आयुक्त साहेब आपली काम करण्याची क्षमता व अंदाज पासून आपण हि पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घेवून बिल्डर व राजकारणी लोकांचा डाव उधळून लावावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी निवेदनाद्वारे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. आयुक्त आता काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Take over the site of Punawale waste depot, social activist Ramesh Waghere's demand to the commissioner
पुनावळे कचरा डेपोची जागा ताब्यात घ्या ,सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरेंची आयुक्तांकडे मागणी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *