महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पेन व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे केले स्वागत

रोहित खर्गे
विभागीय संपादक
५ ऑक्टोबर २०२१

पिंपरी 

कोरोना संसर्गाच्या प्रार्दुभावामुळे शाळा बंद असल्याने  विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणामध्ये खंड पडलेला असून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करुन तो भरुन काढावा.  देशाचे तुम्ही भवितव्य आहात तेव्हा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन सुरक्षित रहा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शहरा भागांमधील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत.  त्यांचे स्वागत करण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी काही शाळांना भेटी दिल्या व विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फुल व पेन देऊन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.

सांगवी येथील नृसिंह हायस्कूल, पिंपळेगुरव येथील महानगरपालिका माध्यमिक शाळा चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर विद्यामंदीर, व अजंठानगर येथील माता रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळेला त्यांनी भेट दिली.  यावेळी शिक्षण मंडळ सभापती मनिषा पवार, जैव व विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, ड प्रभाग अध्यक्ष सागर आंगोळकर, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसदस्या शारदा सोनवणे, योगिता नागरगोजे, स्वीकृत नगरसदस्य मोरेश्वर शेडगे, पर्यवेक्षिका अनिता जोशी, मुख्याध्यापिका अनिता रोडगे, सुनिता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, प्रमोद ठाकर आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, नवीन पिढीची देशाला गरज आहे.  कोरोना अद्यापही संपलेला नसून तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असे तज्ञांचे मत आहे.  तरी विद्यार्थ्यांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.  सर्वांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंग पाळावे, सतत हात साबणाने स्वच्छ धुवावे, सर्व कोरोनाशी संबंधित शासकीय नियमांचे, सूचनांचे पालन करावे, वेळप्रसंगी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे अशाही सूचना महापौर माई ढोरे यांनी विद्यार्थ्यांना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *