यश मिळवण्यासाठी ध्येय्य निश्चिती गरजेची – उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२२ एप्रिल २०२२

नारायणगांव


अपेक्षित यश मिळवण्यासाठी शैक्षणिक जीवनापासून ध्येय्य निश्चित करून मेहनत घेणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर विद्यार्थी विकास प्रकल्पामध्ये भाग घेतला पाहिजे, असे मत जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी कुरण (ता.जुन्नर) येथे बोलताना व्यक्त केले.

एन.एस.एस. तसेच एन.सी.सी. यासारख्या प्रकल्पामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास तर होतोच शिवाय सामान्य ज्ञान विकसित होण्यास मदत होते. स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी या गोष्टींचा कसा उपयोग होतो हे स्वतःचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर ठेवताना त्यांनी सांगितले. कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याचबरोबर तरूण मुलामुलींनी सोशल मिडीयाचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे हे महाविद्यालयीन तरूणांना पटवून दिले.


जयहिंद शैक्षणिक संकुलाचे वार्षिक कला व क्रिडा स्पर्धा स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध क्रिडा स्पर्धा पार पडल्या तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. हेमंत महाजन, प्रा. अमित हेजीब यांनी केले. क्रिडा स्पर्धांसाठी प्रा. देविराज अबुज व प्रा. सचिन भोसले यांनी काम पाहिले. प्रा. सुभाष कुडेकर हे परिक्षक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, नारायणगांवचे सरपंच योगेश पाटे, जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे,इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. गरकळ, तंत्रनिकेतनचे प्राचार्य योगेश गुंजाळ, आय. टी. आय.चे प्राचार्य एस. डी. आंद्रे उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *