बिरसा ब्रिगेड सह्याद्री आंबेगावच्या वतीने,राज्याचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांचे मानले आभार…

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी 
राज्याचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांची मार्गदर्शक समाजकल्याण माजी सभापती, आदिवासी नेते सुभाषराव मोरमारे साहेब
यांच्या अध्यक्षतेखाली भेट घेतली.यावेळी पंचायत समिती आंबेगाव येथील क्रांतिस्तंभावर क्रांतिकारक होण्या केंगले यांच्या नावाचा समावेश करण्यासाठी
आदिवासी विचारमंच, आदिवासी क्रांती संघटना, बिरसा ब्रिगेड सह्याद्री आंबेगाव यांच्या पाठपुराव्याला मंत्रालय पातळीवर केलेल्या सहकार्याबद्दल संघटनेच्या वतीनेआद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांची प्रतिमा भेट देऊन साहेबांचे आभार माणण्यात आले.
       5 सप्टेंबर रोजी जुन्नर येथील शिवनेरी किल्यावर असणाऱ्या महादेव कोळी चौथरा अभिवादन दिन साजरा करण्यासाठी परवानगी मिळावी.तळेघर येथील ATM केंद्र लवकर सुरुकरावे.साखरमाची पुनर्वसन बाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी.प्रकल्प कार्यालय घोडेगावच्या आवारात आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा आदिवासी विकास विभागामार्फत उभारण्यात यावा. इत्यादी आदिवासी बांधवांच्या  विविध समस्यावर सकारात्मक चर्चा  बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी सर यांच्या पुढाकाराने पार पडली.

यावेळी आदिवासी विचारमंचे प्रदीप पारधी सर, गोविंद केंगले सर, राजेश डामसे सर, मार्गदर्शक माष्टर दूंदा किर्वे सर, आहुपे गावचे सरपंच रमेश लोहकरे दादा , युवानेते मारुती दादा केंगले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *