ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी ह्या शैक्षणिक संस्थेचा प्रलंबित गायरान जागेचा प्रश्न मार्गी

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०४ जून २०२२

आळेफाटा


आळे (ता.जुन्नर) येथील नामांकित असलेली शैक्षणिक संस्था ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे,संतवाडी, कोळवाडी च्या सन १९८८ पासून ताब्यात असलेली सरकारी जमीन आज महाराष्ट्र राज्य शासन महसूल विभाग यांनी (शासन ज्ञानप क्र ३४१४/प्र क्र.२०१/ज-५) शासन नियमानुसार नियमित केले, याबाबत संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुऱ्हाडे यांनी सदर जमिनीचा प्रलंबित प्रश्न सन २०१२ पासून आम्ही सर्व तत्कालीन पदाधिकारी व संचालक प्रयत्न करत होतो, संस्थेने २०१९ पासून पुन्हा ह्या प्रकरणी शासन दरबारी पाठपुरावा करून शासनाच्या महसूल विभागाकडून आज रीतसर १२५ आर क्षेत्र संस्थेस प्राप्त करून दिले. ह्या कामी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आमदार अतुल बेनके तसेच माजी व विद्यमान संचालक मंडळ, सभासद, ग्रामस्थ, आळे संतवाडी कोळवाडी गावचे माजी व विद्यमान सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, विविध शासकीय अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त, विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच माजी विद्यार्थी संघ मुंबई व पुणे यांचे सहकार्य लाभले अशी माहिती दिली.

ह्या जमिनीमुळे संस्थेस नवनवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा तसेच नवीन इमारत उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही अध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे यांनी सांगितले. तर आळे संतवाडी कोळवाडी गावातील ग्रामस्थ व सभासद यांनी संस्थेचे अध्यक्ष भाउदादा कुऱ्हाडे व संचालक मंडळ यांचे ह्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल भरभरून कौतुक केले आहे व गावात व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अध्यक्ष भाऊसाहेब कुऱ्हाडे यांनी सर्वांचे ह्या कामी सहकार्याबद्दल आभार मानले असून संस्थेची इतरही प्रशासकीय प्रलंबित कामे लवकर मार्गी लागणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच संस्थेचे सभासद मी व माझे सहकारी संस्थेच्या हितासाठी जो निर्णय घेतात त्याला सर्वजण सभासद नेहमीच एकमताने पाठींबा देत असतात आणि संस्थेच्या हितासाठी सर्व सभासद हे माझ्या पाठीशी ठाम उभे असतात, सभासद यांचा माझ्यावरील प्रचंड असलेल्या विश्वासामुळे हे काम करू शकलो शेवटी संस्थेचे सभासदच संस्थेचा गाभा आहे असेही अध्यक्ष भाऊसाहेब कुऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *