राजगुरुनगर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; ८४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

अक्षता कान्हूरकर
राजगुरुनगर प्रतिनिधी
१७ सप्टेंबर २०२१

राजगुरुनगर :

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून खेड पोलीस स्टेशनच्या वतीने  आयोजीत करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ८४ रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. खेड पोलिस स्टेशनच्या आवारात आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, पोलिस उपनिरीक्षक राहुल लाड, घोलप,  भारत भोसले तसेच पोलिस पाटील सह शहरातील नागरीक उपस्थित होते.

या रक्तदान शिबीरासाठी पुणे येथील मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेच्या डाँक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी  सहभाग घेऊन रक्तसंकलनासाठी मोलाचे सहकार्य केले. पुणे ग्रामीण चे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या सकंल्पनेतुन कोरोना महामारीच्या काळात नागरीकांना रक्ताची कमतरता भासु नये यासाठी तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात न आल्याने जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाचे नियम पाळून गणेश भक्त व नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने आणि सामाजिक भान राखत गणेशउत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

तसेच तिसरी लाट येऊ नये व कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या सामाजीक बांधीलीकीचा उददेश साध्य होण्याच्या दृष्टिकोनातून खेड पोलीस स्टेशनतर्फे पोलीस पाटील, होमगार्ड, महीला दक्षता कमिटी, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या सहकार्यातून आदर्श गणेशोत्सव २०२१ मध्ये साजरा करण्यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबीर खेड पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात पोलिस कर्मचारी, होमगार्ड, आणि पोलिस पाटील यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.

Immediate response to blood donation camp organized by Rajgurunagar police station; 84 blood donors donated blood
राजगुरुनगर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; ८४ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *