पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन

कैलास बोडके
प्रतिनिधी
१५ सप्टेंबर २०२१

बारामती

बारामती शहर व वालचंदनगर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबीरात १००० पेक्षाही अधिक युनिट रक्त जमा होते .पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, यांच्या संकल्पनेतुन कोरोना महामारीच्या काळात नागरीकांना रक्ताची कमतरता भासु नये, तसेच कोरोनाच्या महामारीच्या काळात पारंपरीक पध्दतीने उत्सव साजरा करून तिसरी लाट येवु नये व त्याचा संसर्ग वाढु नये या सामाजिक बांधीलकीचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीकोनातुन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सहाकार्य घेवुन आदर्श गणेश उत्सव सन २०२१ साजरा करण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करणेबाबत सुचीत करण्यात आले होते .

Pune Rural Superintendent of Police Dr. Blood donation camp organized by Abhinav Deshmukh
पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन

त्या अनुषगांने आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहते उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी नामदेव शिंदे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनच्या आवारात रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज रोजी दिनांक १५ सप्टेंबर रोजी डॉ. अभिनव देशमुख यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केल्या नंतर सर्व प्रथम डॉ. अभिनव देशमुख, मिलींद मोहिते, नारायण शिरगावकर आणि नामदेव शिंदे यांनी रक्तदान करून खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवत सुरूवात केल्या नंतर बारामती तसेच परिसरातील विविध सामाजिक संघटना, गणेश उत्सव मंडळ, युवा कार्यकर्ते, महिला मंडळ, कॉलेजचे युवा – युवती तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले.डॉ. अभिनव देशमुख यांनी आत्ता पर्यंत 12वेळा रक्तदान केले आहे.सदरचे रक्तदानात अक्षय ब्लड बँक, पंढरपुर ब्लड बँक, आशा ब्लड बँकेच्या तज्ञ डॉक्टर व आरोग्य सेविका यांच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *