महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले मतदान जागृती या विषयावर पथनाट्य

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२४ नोव्हेंबर २०२१

घोडेगाव


घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी अभियानांतर्गत मतदार नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पचे उद्घाटन आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.बी. जाधव, नोडल अधिकारी प्रा.एस. एल.नेवकर, तलाठी श्री. राहुल पंदारे, महसूल कर्मचारी श्री.माऊली घोडेकर हे उपस्थित होते.या वेळेस एकूण १५० विद्यार्थ्यांनी मतदार नाव नोंदणी अंतर्गत नमुना -६ फॉर्म भरून दिले.तसेच महाविद्यालयाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी ‘जागर कोरोना मुक्तीचा आणि मतदान जागृती’ या विषयावर पथनाट्य सादर केले. महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य पाहून मा. तहसिलदार रमा जोशी यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *