घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने,गुरुवारी आयोजित तक्रार निवारण दिनास उपस्थित राहण्याचे केले आवाहन…

 

आंबेगाव ब्युरोचिफ -मोसीन काठेवाडी

घोडेगाव ता. आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी गुरुवार दिनांक 9/9/2021 रोजी सकाळी 10 वाजता तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून तक्रारदार यांच्या तक्रारीचे ताबडतोब निवारण करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन यांना आदेश दिले आहेत.

त्याप्रमाणे घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोविड १९च्या प्रादुर्भावमुळे मागील अनेक दिवसापासून तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला नव्हता परंतू सदरचा तक्रार निवारण दिवस इथून पुढे पोलिस स्टेशन स्तरावर नियमित पणे दर महिन्याला आयोजित करण्यात येणार आहे. सदर तक्रार निवारण दिनी पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण , साहायक पोलीस निरीक्षक ,पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार हे उपस्थित राहणार आहेत तरी सदर दिनी ज्या नागरिकांच्या अकस्मात मयत मुद्देमाल (सोन्याची वस्तू गाडी व इतर वस्तू )तक्रारी किंवा तक्रारी अर्ज आहेत त्यांचे निराकरण होण्याकरता गुरुवारी सकाळी दहा वाजता घोडेगाव पोलीस स्टेशन येथे उपस्थित ,पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित अर्जदार गैर अर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारीवर त्वरित निर्णय घेऊन, पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त तक्रारदार यांनी त्यादिवशी उपस्थित राहून आपल्या तक्रारीचा ताबडतोब निपटारा करून घ्यावा, असे आवाहन घोडेगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी साहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *