श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानची यात्रा उत्साहात संपन्न । कोरोनामुळे मोजक्याच भाविकांची उपस्थिती…

बेल्हे ( विभागीय संपादक रामदास सांगळे) :- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा (ता.पारनेर) येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या वार्षिक यात्रेच्या शेवटच्या व मुख्य दिवशी परंपरेप्रमाणे बेल्हे व ब्राह्मणवाडा येथील मानाच्या काठ्यांच्या शासकीय महापुजेनंतर या काठ्यांनी खंडोबाचे कळस व देवदर्शन घेतले या नंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांनी खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर कोरठण खंडोबा देवस्थानच्या यात्रा निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.
      पहाटे ५ वा.खंडोबा चांदीचे सिंहासन व उत्सव मुर्तीना साजशृगांर करण्यात आल्यानंतर पुजा व अक्षय येवले या दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यानंतर स.६.३० वा पोलिस उपनिरीक्षक शंकर राजपूत यांच्या हस्ते खंडोबाची महाआरती अभिषेक महापुजा करण्यात आली. यानंतर स.१० वा.कोरठण खंडोबा, बेल्हे, सावरगांव घुले, कांदळी, माळवाडी, कळस या मानाच्या पालख्यांनी देवभेट घेण्यासाठी  मंदिर प्रदक्षिणा सुरू केली. दु.१२ वा.लंगर तोडून पालख्या मंदिरासमोर आल्यानंतर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड यांनी या पालख्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक शंकर राजपूत यांनी पालखी मानकर्याचा सन्मान केला. दुपारी १ वाजता परवानगी दिलेल्या मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत बेल्हे व ब्राह्मणवाडा तसेच कळस, साकोरी, वाफारेवाडी, गारखिंडी, हिवरे नारायणगाव, बुगेवाडी येथील मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघाली.दुपारी २ च्या सुमारास   बेल्हे व ब्राह्मणवाडा या दोन्ही काठ्या मंदिरासमोर आल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे व पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या हस्ते या काठ्यांची शासकीय महापुजा झाली.महापूजेनंतर बेल्हे या काठीने कळस तर ब्राह्मणवाडा काठीने देवदर्शन घेतले. यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांनी देवदर्शन घेतल्यानंतर यात्रा निमित्ताने परंपरेप्रमाणे आयोजित कार्यक्रमांची सांगता झाली.कोरोनामुळे मोजक्याच भाविकांच्या उपस्थित यात्रा संपन्न झाली.या वेळी पारनेर पोलिसांचा मोठा बंदोस्त होता.
      यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, प्रांताधिकारी भारती सागरे, विश्वस्त किसन धुमाळ, मनिषा जगदाळे, किसन मुंढे, बन्सी ढोमे, गोपीनाथ घुले,हनुमंत सुपेकर,भालचंद्र दिवटे,अरूण कुलकर्णी,रामदास मुळे, सुरेश सुपेकर,विश्वस्त अमर गुंजाळ,दत्तात्रय क्षीरसागर, विलास शिंदे यांसह भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *