इयत्ता १० वी १२ वी मध्ये ८० % पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या (२०२०/२०२१) मधील विध्यार्थीना देखील मनपा कडून मिळणार बक्षीस रक्कम ; आमदार अण्णा बनसोडे यांच्या मागणीला यश…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड – दि. १७ ऑगस्ट
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या सरकारी व खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विध्यार्थ्यांना मनपा च्या नागरी विकास योजना विभागाकडून इयत्ता १० वी १२ वी मध्ये ८० % गुण संपादन केलेल्या विध्यार्थ्यांना कल्याणकारी योजनेतुन ठरविक रक्कम बक्षीस दिली जाते .

परंतु मागील वर्षी २०२० मध्ये कोरोना काळात टाळेबंदी मुळे अनेक विद्यार्थी सदर विभागाकडे विहित वेळेत अर्ज करू शकले नाही , अश्या विद्यार्थीनी आमदार बनसोडे यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या . आमदारांनी विषयाची तात्काळ दखल घेत आयुक्तांकडे मागील वर्षी राहिलेल्या विद्यार्थीचे अर्ज परत भरून घ्या , अशी मागणी केली . आमदारांच्या मागणीची दखल घेत नागरी वस्ती विभागातर्फ़ मागील वर्षी (२०२० -२१) राहिलेल्या विद्यार्थीनी चालू वर्षात अर्ज करावे असे प्रसिद्धी पत्रक काढले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *