खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आकाश चतुर्वेदी यांनी बांधले शिवबंधन,आकाश चतुर्वेदी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश…

प्रतिनिधी : लक्ष्मण दातखिळे, पिंपरी – चिंचवड
दि. २४ जुलै २०२१

पिंपरी-चिंचवड शहरातील युवा नेते आकाश चतुर्वेदी यांनी आज मुंबई येथील शिवसेना भवन येथे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. सामाजिक कामात अग्रेसर असणारे आकाश चतुर्वेदी हे मागील काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात उत्तम सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आकाश चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी शिवसेना नेते आमदार दुष्यंत चतुर्वेदी, रवींद्र मिर्लेकर, बाळा कदम व शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख नगरसेवक सचिन भोसले उपस्थित होते. आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आकाश चतुर्वेदी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेची ताकद नक्कीच वाढणार आहे. शिवसेना पक्षाला शहरात नवीन युवा कार्यकर्ते जोडण्यास आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आपण शिवसेनेचे विचार शहरभर पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे यावेळी आकाश चतुर्वेदी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *