पिंपळे गुरव मध्ये गुरुपौर्णिमे निमित्त ओम साई फौंडेशनच्या वतीने शिक्षकांचा सत्कार…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपळे गुरव- दि २५ जुलै २०२१
गुरुवर्य आमदार.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेतून व माजी.नगरसेवक शंकरशेठ जगताप मार्गदर्शना मधे गुरुपौर्णिमे निमित्त ओम साई फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील रेखीव कामगिरी करणाऱ्या गुरुवर्य यांचा सन्मान पिंपरी चिंचवडच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे व संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे यांच्या हस्ते मल्हार गार्डन,नवी सांगवी येथे करण्यात आला.

या प्रसंगी पिंपरी चिंचवड चे महापौर माई ढोरे बोलताना म्हणाल्या की प्रत्येकाला गुरू हा असतोच जी म्हणजे जन्मदाती आईच तिच्या चांगल्या संस्कारा मुळेच आपण घडत असतो व त्यानंतर विद्यार्थ्यांवर संस्कार,संस्कृती,आदर असे पैलू पाडण्याचे काम गुरुजन करतात. मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन,एखादी कलाकृती साकारतो,त्याच प्रमाणे गुरुवर्य बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून जबाबदार नागरिक घडवतात.

या प्रसंगी ओम साई फौंडेशन चे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक असून,सक्षम व आदर्श पिढी घडविण्याचे सामर्थ्य गुरुवर्य मध्ये असते.

या वेळी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे गुरुवर्य मुकेश पवार,मनीषा जाधव,चंद्रकांत सोनवणे,राजू सावंत,श्यामला शिंदे,मनीषा पाटील,सचिन शिंगोटे,बलभीम भोसले,सुधा खोले यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे,सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे,भाजपाच्या युवती अध्यक्ष सोनम गोसावी,उपअध्यक्ष ज्योती खंडारे, रामचंद्र गायकवाड,राजेंद्र बाईत,रमेश चौधरी आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *