भिमाशंकर मार्गे पोखरी घाटातील कोसळलेली दरड हटवली : मंचर -भिमाशंकर मार्ग वाहतुकीस खुला

भिमाशंकर :-
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
         आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्टयातील परिसरात, बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊसाने थैमान घातले होते. तसेच भिमाशंकरकडे जाणाऱ्या गोहे बु.जवळील पोखरी घाटात दरड कोसळल्याने, भिमाशंकर व पोखरी गावचा संपर्क तुटून पुर्णपणे वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही दरड हटवत दुपारी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.
         मंचर -भिमाशंकर महामार्गावरील पोखरी घाटात,रस्त्यावर दगड , मातीसह झाडे देखिल अन्मळून पडली होती.गेली काही वर्ष सातत्याने या मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सध्या भिमाशंकर परिसरात पर्यटनासाठी कलम १४४ लागू   असल्याने या महामार्गावर वाहनांची गर्दी कमी असल्याने, कुठल्याही प्रकारची  जिवीतहानी घडली  नाही.


     आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदीवासी पट्टयातील विविध भागात,अतिवृष्टी झाल्याची माहिती कळताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने, या भागात  पाहणी दौऱ्याचे आदेश दिले  त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व प्रशासनातील आधिकारी सध्या आदिवासी भागात थांबून रस्ते दुरूस्ती व  वाहतुक पुर्ववत करण्यासाठी काम करत आहेत तसेच स्थानिक नागरिक देखिल मदतीला धावून येत आहे.
         या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील ,आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी  जालिंदर पठारे, पंचायत समितीचे  सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, पंचायत समिती सदस्या इंदुबाई लोकरे, डिंभेचे उपसरपंच प्रदीप आमोंडकर , घोडेगावचे साहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश पठाडे शाखा अभियंता बांबळे यांनी परीसरात ज्या ज्या  ठिकाणी अशा घटना ,घडलेल्या आहेत,  त्या ठिकाणी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. तसेच ठिक ठिकाणच्या दरडी हटवल्या आहे ,सध्या घोडेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कुठलाही,रस्ता बंद नसल्याची माहीती घोडेगावचे साहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *