‘नळवणेतील शेतकऱ्यांना शेतीच्या मोबाईल ॲप्सचे कृषीदुताकडून मार्गदर्शन’…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.22/7/2021

‘नळवणेतील शेतकऱ्यांना शेतीच्या मोबाईल ॲप्सचे कृषीदुताकडून मार्गदर्शन’

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

नळवणे (ता- जुन्नर) येथील शेतकऱ्यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील सातव्या सत्रातील कृषीदुत अमोल शांताराम गगे याने covid-19 मुळे कॉलेज बंद असल्यामुळे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती विषयक नवीन तंत्रज्ञान मोबाईलद्वारे कसे वापरावे या विषयाच्या नवीन ॲप्स ची माहिती देऊन मार्गदर्शन केले
यावेळी शेती आधारित प्रात्यक्षिके सादर करणे शेत जमीन व्यवस्थापन व पीक उत्पादन या विषयांवर आधारित तसेच शेती आधारित तंत्रज्ञान मोबाईल द्वारे कसे वापरावे या विषयाची नवीन ॲप्स अनुप्रयोग ची माहिती दिली जसे की फुले कृषीदर्शनी ॲप, मेघदूत ॲप, फलो की खेती अॅप, पोमोलॉजी ॲप, इनाम ॲप, मार्केट यार्ड ॲप इत्यादीसारख्या अनेक उपयुक्त ॲप्स ची माहिती व त्यांचा वापर आणि उपयोग या सोबतच शेतातील तण नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती प्रात्यक्षिकांसह करून दाखविण्यात आली तसेच शेतकऱ्यांच्या शेतीच्या असणाऱ्या समस्या व विविध अडचणींवर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील या विविध विषयांवर चर्चासत्रे घेऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चलचित्र व व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन केले
यासाठी त्याला डॉ . बी . टी . कोलगणे कार्यक्रम समन्वयक , डॉ . आर. आर. हसुरे संचालक आणि डॉ. एच. बी. काळभोर कार्यक्रम अधिकारी रा. छ . शा. म . कृ . म . कोल्हापूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास कारभारी शिंदे, सुनिल शिंदे, गणेश शिंदे, सौरभ शिंदे, ईश्वर शिंदे,संगिता शिंदे, सिताबाई शिंदे,आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *