आषाढी एकादशीचा प्रति पंढरपूरचा यात्रोत्सव रद्द, भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये:- देवस्थान कमिटीचे आवाहन…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.19/7/2021

आषाढी एकादशीचा प्रति पंढरपूरचा यात्रोत्सव रद्द, भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये:- देवस्थान कमिटीचे आवाहन

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

बांगरवाडी:- जुन्नर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बांगरवाडी येथील श्री क्षेत्र गुप्त विठोबा मंदिर येथे दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो भाविक व परिसरातील गावातून असंख्य दिंड्या दर्शनासाठी येत असतात, गुप्त विठोबा मंदिर देवस्थान,मुंबई व पुणेकर रहिवाशी बांगरवाडीकर यांच्या सहकार्याने येथे खिचडी महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते परंतु सलग दुसऱ्याही वर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्या कारणाने गुप्त विठोबा देवस्थान यात्रा कमिटी बांगरवाडीने यावर्षी यात्रा महोत्सवाचे आयोजन व दर्शन रद्द केले असून एकादशी व बारशीला भाविकांनी बांगरवाडी येथे दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यांची भाविकांनी काळजी घेत आपापल्या घरीच
राहावे व यात्रा कमिटी,प्रशासन व पोलीस खात्यास सहकार्य करावे.यासंबंधी आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी गुप्त विठोबा देवस्थान यात्रा कमिटी यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या,यावेळी बैठकीला देवस्थानचे अध्यक्ष नकाजीबुवा बांगर,बांगरवाडी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कदम,बांगरवाडीचे सरपंच जालींदर बांगर,प्रमोद बांगर, मोहन बांगर,गजानन फराटे,नामदेव बांगर व इतरही ग्रामस्थ उपस्थित होते.एकादशी व बारशीच्या दिवशी नेहमी होणारे सर्व धार्मिक विधी होणार असून यावेळी फक्त यात्रा कमिटीच उपस्थित राहणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष नकाजीबुवा बांगर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *